आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्रिया:ईडीच्या छापेमारीनंतर शिवसेना खासदार भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या - 'शिवसेनेच्या मंत्री, नेत्यांना टार्गेट केले जातेय, आणीबाणीसारखी वागणूक दिली जातेय'

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही - भावना गवळी

अंमलबजावणी संचालनालयाने यवतमाळ-वाशिम लोकसभेच्या खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थांवर सोमवारी छापेमारी केली. गवळी यांच्या वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील 5 संस्थांवर छापेमारी करण्यात आहे. छापेमारीदरम्यान, ईडी संबंधित संस्थांनाच्या कागदपत्राची चौकशी करत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. दरम्यान आता या प्रकरणावर भाजप खासदार भावना गवळींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना भावना गवळी म्हणाल्या की, 'मला ईडीकडून कोणतीही नोटीस आलेली नाही. मात्र संस्थांवर ईडीचे अधिकारी आले आहेत. त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. आणीबाणीसारखी वागणूक दिली जात आहेत. यासोबतच शिवसेनेच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. माझ्या संस्थेचा एफआयर मी स्वत: नोंदवला होता. मला तो हिशोब मिळाला नाही म्हणून मी तक्रार दाखल केली होती. त्यामधील एकच वाक्य पकडायचे आणि त्यातला एकच आकडा घेतला आणि ट्वीट करत मोठा राईचा पर्वत बनवला. असा खेळ राजकीय नेत्यांनी काही दिवसांपासून मांडलेला आहे. माझ्या संस्थेची जी चौकशी होत आहे. तिथे ग्रामीण भागातील मुले ही शिक्षण घेत आहेत. गेल्या 20 वर्षांपासून विद्या देण्याचे काम त्या ठिकाणाहून केले जात आहे. मी पाचवेळा या भागातून खासदार झालेली आहे. कदाचित काही लोकांना ते चांगले दिसत नाही.'

बातम्या आणखी आहेत...