आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राने आतापर्यंत साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, संस्कृती, नाट्य, चित्रपट, संगीत, सहकार, कृषी, उद्योग, संगणक, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. महाराष्ट्राच्या उज्वल भविष्यासाठी आपल्या पूर्वजांनी जे योगदान दिले त्याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. तसेच देशात सामाजिक सलोखा राखण्यात व सर्वच समाजाला एकसूत्रात बांधण्यात महाराष्ट्र यशस्वी झाला आहे तसेच सर्वधर्म समभाव ही शिकवण महाराष्ट्रानेच प्राणपणाने जपली शिवाय भारत देशात आर्थिक व सांस्कृतिक भरभराटीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. असे मत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात विद्यानिकेतन शाळेचे अध्यक्ष डॉ. संजय बंग यांनी व्यक्त केले.
सर्वप्रथम शिवछत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले तसेच शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे नितिन राऊत व विलास राऊत यांनी ध्वजारोहण केले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला व शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती ढोडरे यांनी टॉपर्स फाउंडेशन चे महत्व व संकल्पना उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले.यानंतर शाळेचे शिक्षक चंद्रकांत पोरे यांनी वाढती लोकसंख्या व स्त्री-पुरूष समानतेवर एकपात्री नाटिका सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे शिक्षक युवराज मोहेकर अमित वानखडे, निखील निमकर, अमोल वानखडे, श्रीनिवास देशपांडे, दिपक काराणी, मनोज चावरे हेमंत डुबे यांनी परिश्रम घेतले. संचलन शाश्वती ठाकरे व रिया वास्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन माही उपलेंचवार हिने मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.