आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथे मोठा मारोती मंदिर परिसरात महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन कार्यक्रम घेण्यात झाला. महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी समारंभ समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबाराव मेत्रे, तर प्रमुख वक्ते म्हणून अक्षरा प्रविण कावलकर, ॲड. सोनाली चीचाटे, गणेशराव ओंकार लाभले होते. तर प्रमूख अतिथी म्हणून नानासाहेब बरडे, चंदू चांदोरे, नगरसेवक सुनीता निमकर, प्रविण हजारे, दत्तात्रय येंडे, गणेशराव हजारे. प्रा. टि. सी.ओंकार, निरंजन फुलकर, प्रा. अंभोरे, भाऊराव ओंकार आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजनानंतर सावित्री आई फुले महिला मंडळातर्फे अर्चना हजारे, प्राजक्ता केवटे, नीलिमा हजारे, मेघा केवटे, गायत्री नवाडे यांनी वंदन गीत सादर केले. प्रास्ताविक रवींद्र ओंकार यांनी केले. प्रमुख वक्ते अक्षरा प्रविण कावलकर हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली. ॲड. सोनाली चिचाटे, गणेशराव ओंकार यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांचे विचार आपल्या दैनंदिन जीवनात कसे आचरणात आणले पाहिजे या बाबत मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आयोजन समिती तर्फे मान्यवरांचे हस्ते गुणवंत विद्यार्थी व विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी कवडू मालखेडे, गजनान काळे, प्रविण निमकर, सुरज वैद्य, प्रशांत महाराज ओंकार, विजय गुरणुले, दत्ता गुरणुले, डॉ. प्रविण झाडे, शुभम नवाडे, सुजित गोरे, जयदेव केवटे, नितीन होले, महेश चांदोरे, राहुल काळे, निलेश हजारे, भुषण गोरे, राजु काळे, संजय कुबडे, गोविंदराव गाऊत्रे, दीपक येंडे, गजानन उघडे, विकास खडतकार, गजानन चांदोरे, भावेश पोलकडे, डोमाजी होले नितीन पोलकडे, प्रज्वल काळे, राजेंद्र येंडे, प्रसाद होले, गजानन होले तथा परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.