आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ तसेच अमरावती पदवीधर मतदार संघ व नागपूर शिक्षक मतदार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद येथील महाविकास आघाडीचे विक्रम काळे तर अमरावती येथे महविकास आघाडीचे धीरज लिंगाडे तर नागपूर येथील शिक्षक आमदारांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी, सोबत बावीस शिक्षक संघटना समर्पित विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी भरघोस मतांनी विजय संपादन केला.
हा विजय पदवीधर बंधू-भगिनी, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना अशा अनेक विषयाला अनुसरून झाला असून त्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी राळेगाव काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयासमोर दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी फटाके फोडून व विजयाचे नारे देत आनंद साजरा करण्यात आला. यावेळी अरविंद वाढोणकर, तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, मिलिंद इंगोले, संजय देशमुख, रवि शेराम, अंकुश रोहणकर, भरत पाल, श्रावनसिंग वडते,पुरूषोत्तम चिडे, अंकुश मुनेश्वर, अशोक काचोळे, मोहन नरडवार, गजानन पाल, धवल घुंगरूड, भैय्या बहाळे, राहूल बहाळे, रामू भोयर, प्रफुल्ल तायवाडे, अफसर अली, गोवर्धन वाघमारे, राहूल बहाळे, अंकित कटारिया यांचे सह अनेक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.