आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश नवमी:माहेश्वरी समाजाच्या वतीने महेशोत्सव साजरा; महेश नवमी प्रीत्यर्थ दिग्रसमध्ये आठवडाभर विविध कार्यक्रम

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहेश्वरी संघटना, माहेश्वरी महिला संघटना व युवा संघटना यांचा दिग्रसमध्ये संयुक्त उपक्रम

माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस महेश नवमी पर्व उत्साहात साजरा करण्यात आला. दिग्रस तालुका माहेश्वरी संगघटना, महिला संघटना आणि युवा संघटनेच्या संयुक्त पुढाकाराने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम पार पडले.

माहेश्वरी समाजाची उत्पत्ती भगवान महेश यांच्या करूणेतून झालेला आहे. हा उत्सव आपल्या कुटुंबासोबत तसेच सर्व समाजाने एकत्र साजरा करण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हाध्यक्ष पवन पानपालीया यांनी केले होते. या अंतर्गत हिंदू स्मशानभूमीत एक परिवार फल वृक्ष या संकल्पाने ५५ घरांकडून ५५ वृक्षारोपण करण्यात आले. त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार संघटनेने केला आहे. तर बॉक्स क्रीकेट, कॅरम, चेस, अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बालाजी मंदीर संस्थान येथे रक्‍तदान शिबिर तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संस्कारो की पाठशाला अंतर्गत जीवन विद्या मिशन मुंबईद्वारा गर्भ संस्कार शिबिर झाले. नीता मुंदडा यांचे पती-पत्नीतील संबंध अधिक दृढ करणारा जानम समझा करों ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सोमवारी हमारी संस्कृती हमारी विरासत या विषयावर डॉ. राजेंद्र जाजू यांचे मार्गदर्शन झाले.

तर महिला संघटनेद्वारा विवाह विच्छेद, घटती जनसंख्या बेटी ब्याहो बहू पढाओ या विषयांवर नाटिका झाल्या. मंगळवारी रामायण और महाभारत से हम क्या सिखे या विषयावर बुलडाणा येथील डॉ. तुषार डोडीया यांचे संस्कार सत्र झाले. बुधवारी महेश नवमी निमित्त शिवाजी चौकात भगवान महेश यांच्या प्रतिमेचे सुशोभीकरण करण्यात आले होते आणि सायंकाळी भगवान महेश यांची शोभायात्रा काढण्यात आली होती. यावेळी मदनलाल मालपाणी मलकापूर यांची विशेष उपस्थिती होती. समाजात वाढत असलेल्या समस्येबाबत चर्चा सत्र आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. समाजातील दोन किंवा तीन मुलींच्या मातांचे समाज कल्याणी हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समाज बंधूंनी पुढाकार घेतला होता.

बातम्या आणखी आहेत...