आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:उन्हाळी परीक्षेत दोन्ही पर्याय उपलब्ध करा; ऑनलाइन, ऑफलाइन पर्यायासाठी लॉ कॉलेजचे शेकडो विद्यार्थी धडकले जिल्हाकचेरीवर

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळी परीक्षा २०२२ करिता ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार, ५ एप्रिलला शहरातील विधी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. आगामी होणाऱ्या उन्हाळी परीक्षेबाबत हजारो विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम व भीतीचे वातावरण आहे.

राज्य शासनाने कुठल्याही परिस्थितीचा आढावा न घेता तसेच विद्यार्थ्यांची समस्या जाणून न घेता उन्हाळी परीक्षेचा निर्णय सर्वस्वी विद्यापीठाना दिले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडून मनमानी कारभार होत असल्याचे निदर्शनात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा २०२२ करिता ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी विधी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. याप्रसंगी अनुराग दहाके, वैष्णवी झोड, श्रीकांत आडे, शाहरूख काझी, जीत पवार, शिपाश्री चौधरी, राहुल मानकर, प्रज्ञा बोबडे यांच्यासह शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...