आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना आवाहन:योगाभ्यास दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रतिपादन

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोज योग केल्यास आपले शारीरीक व मानसिक आरोग्य चांगले राहून आपली कार्यक्षमता वाढण्यास नक्कीच फायदा होतो. त्यामुळे शारीरिक व्यायामासाठी रोज १५ ते २० मिनीटे वेळ काढून योगाचा अभ्यास वर्षभर करावा व योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आठव्या योग दिन कार्यक्रमानिमित्त केले.

माहिती व प्रसारण मंत्रालयाचे केंद्रिय संचार ब्युरो कार्यालय, जिल्हा प्रशासन व विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, केंद्रीय संचार ब्युरो अमरावतीचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंह झाला, सहायक प्रचार अधिकारी अंबादास यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस.चव्हाण व विविध योग संघटनांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी प्रास्ताविकेतून योगदिनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहायक अधिकारी अंबादास यादव यांनी केले. तर उपस्थितांचे आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी इंद्रवदन सिंह झाला यांनी व्यक्त केले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे, नगरपरिदेचे डॉ. विजय अग्रवाल, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सचिन मिलमिले, चैताली राऊत, महेश पडोळे, योग संस्थेचे समन्वयक राजू पड़गीलवार, आर्ट ऑफ लिव्हिंग चे शंतनु शेटे, दादा सूरजसे, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडलचे महेश जोशी, मनीष गुबे, पतंजली चे संजय चाफले, माया चव्हाण, योग नृत्य परिवाराचे कमल बगड़ी, गणेश गुप्ता, राजेश नागौरवाला तसेच क्रीडा भारती, यवतमाळ जिल्हा हौशी असोसिएशन, आरोग्य भारती, संस्कार भारती व विविध योग समिती संघटना मंडळ तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांना आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...