आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमपी जयस्वाल (शिवनाथ) वाईनबारमधील गोळीबार प्रकरणातील कुख्यात ‘कवट्या गँग’वर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. शेख अलीम उर्फ कवट्या शेख कलीम, शेख इमरान उर्फ कांगारू शेख शरीफ, रोहीत अरविंद जाधव, नईम खान उर्फ नईम टमाटर गुलाब नबी खान, आदेश उर्फ आद्या अनिल खैरकार, साजीद उर्फ रिज्जू सलीम सयानी, अस्लम खान उर्फ मारी अकबर खान आणि नयन नरेश सौदागर अशी कवट्या गँगमधील आठ जणांची नावे आहे.
शहरातील छोटी गुजरी परिसरातील एमपी जयस्वाल (शिवनाथ) वाईनबारमध्ये कुख्यात गुंड कवट्या गँगने पूर्वनियोजित कट रचून दारूच्या बिलावरून बार मालकाशी वाद घातला होता. यावेळी बार मालकाला चाकू, काठी, बारमधील ग्लास फेकून मारहाण करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर शेख अलीम उर्फ कवट्या याने देशी कट्ट्यातून एक गोळी झाडली होती.
संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे दणाणले धाबे
मागील काही दिवसात जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात विविध संघटीत टोळ्यांनी डोके वर काढले होते. गुन्हेगारी क्षेत्रात वर्चस्व निर्माण करण्याकरता या टोळ्यांमध्ये चकमकी उघड होत्या. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या घटना त्यांची साक्ष देतात. या संघटीत टोळ्या आपली दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच जिल्ह्यात रुजू झालेल्या नव्या पोलिस अधीक्षकांनी गुन्हेगारी कमी करण्यावर फोकस केला. त्यात अल्पावधीतच एका संघटीत गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट मकोकाचा प्रस्ताव तयार केला. त्यांच्या या धडक कारवाईने संपूर्ण गुन्हेगार क्षेत्र हादरून गेले असून संघटीत गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.