आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय काम:मंडळ अधिकाऱ्याला पांढरकवडा‎ उपविभागीय कार्यालयात मारहाण‎

यवतमाळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय कामानिमीत्त बचत भवनात आलेल्या मंडळ‎ अधिकाऱ्यांसोबत वाद करीत उपविभागीय अधिकारी‎ कार्यालयात मारहाण करण्यात आली. ही घटना‎ पांढरकवडा येथील बचत भवन आणि उपविभागीय‎ कार्यालयात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.‎ या प्रकरणी पांढरकवडा पोलिस ठाण्यात विक्की‎ देशेट्टीवार वय ४० वर्ष रा. पांढरकवडा याच्या विरोधात‎ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.‎ झरी तालुक्यातील खडक डोह येथील मंडळ अधिकारी‎ मनोज चवरे शासकीय कामानिमीत्त पांढरकवडा बचत‎ भवन येथे मंगळवारी आले होते. यावेळी विक्की‎ देशेट्टीवार नामक व्यक्तीने त्यांच्यासोबत वाद घालत‎ शिविगाळ केली. त्यानंतर परत पांढरकवडा‎ उपविभागीय कार्यालयात येवून मारहाण करीत‎ शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी‎ मंडळ अधिकारी चवरे यांनी पांढरकवडा पोलिस ठाणे‎ गाठून तक्रार दिली.‎