आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामान्य ज्ञान:सामान्य ज्ञान स्पर्धेत अनेकांनी मारली बाजी

मारेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय द्वारा तालुक्यातील वर्ग पाचवी ते आठवी तसेच वर्ग नववी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा १० एप्रिलला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, संकेत विज्ञान महाविद्यालय या ठिकाणी परीक्षा पार पडली. सोमवार, दि. २ मे रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे या परीक्षेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक हरीश दरबेशवार, प्रमुख पाहुणे म्हणून वाचनालयाचे अध्यक्ष बाबाराव ढवस, सदस्य मारोती देशमुख व सदस्य राजू डवरे उपस्थित होते. अ गटातून हर्षाली कैलास डोंगरकर हिला प्रथम क्रमांकांचे बक्षीस रोख व मोमेंटो व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस शिवा दिनेश घुले ह्यास रोख रक्कम मोमेंटो व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तर तृतीय बक्षीस रोख रक्कम मोमेंटो व प्रमाणपत्र प्रतीक्षा प्रकाश तावाडे देवून गौरविण्यात आले. ब गटातून प्रांजली नारायण गोवारकर, प्रांजली प्रकाश खंडाळे, समृद्धी सुरेश कवाडे यांना रोख रक्कम, मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन अध्यक्ष व पाहुण्याचे हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिष दरबेशवार यांनी वेळोवेळी वाचनालयामार्फत चालविण्यात येणाऱे उपक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमीच मदत करतात करीता त्यांचाही याप्रसंगी मोमेंटो व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन लीलाधर चौधरी तर प्रास्ताविक मंगेश गवळी यांनी केले. आभार प्रदर्शन दिगंबर दैने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र पोटदुखे, विजय झाडे, संदीप आस्वले, प्रकाश रोकडे, प्रवीण लोंढे, मोहन ठाकरे, हेमराज कळंबे यांनी अथक परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...