आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोधमोहीम:मारेगाव दरोडा प्रकरणाला चार दिवस पूर्ण; अद्यापही पोलिसांना क्ल्यू मिळेना

मारेगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाकूच्या धाकावर चौकीदारासह त्याच्या साथीदारांचे बांधुन ३२ लाखाचा अल्युमिनियम तार लंपास करण्यात आला होता. मारेगाव तालुक्यातील कानडा शेत शिवारात घडलेल्या या घटनेला आता चार दिवसाचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही दरोडेखोरांचा क्ल्यू पोलिसांना मिळाला नाही. मारेगाव पोलिस आणि एलसीबी पथकाकडून सिसिटिव्ही फुटेजची तपासणी करीत दरोडेखोरांची शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

मारेगाव तालुक्यातील कानडा शेत शिवारात एका टॉवर प्रोजेक्टचे काम सुरू होते. त्या ठिकाणी आलम बाबर अली व त्याचा साथीदार जलील अली हे दोघे या प्रोजेक्टच्या वस्तुंच्या देखरेखेसाठी चौकीदारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी दोन अनोळखी व्यक्ती अचानक आले. त्या दोघांनी दोन्ही चौकीदारांना पकडुन हात पाय दुपट्याने बांधले. त्यानंतर चौकीदारांजवळ असलेल्या मोबाइलची मागणी केली. त्यावर आलम अली याने मोबाईल देण्यास नकार दिला असता त्या चोरट्यांनी चाकू व पेचकसच्या जोरावर मारुन टाकण्याचा धाक दाखवत मारहाण केली.

दरम्यान काही अंतरावर त्या दोघांचे हात पाय बांधून ठेवण्यात आले होते. त्यावेळी दोन ट्रकमधून ८ ते ९ अनोळखी व्यक्तींनी येवून २४ टन अल्युमिनियम तारांच्या ड्रम ट्रकमध्ये चढवून पसार झाले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मारेगाव पोलिसांसह एलसीबी पथकाने या प्रकरणातील दरोडेखोरांचा शोध सुरू केला होता. या दरोडा प्रकरणाला आता चार दिवसाला कालावधी लोटला असून साधा क्ल्यू अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. त्यामूळे या दरोडेखोरांचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर येवून ठेपले आहे.

बातम्या आणखी आहेत...