आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:माथेफिरु तरुणाचा शहर पोलिस ठाण्यात धुडगूस; पोलिस कर्मचाऱ्यांनाही युवकाकडून मारहाण

यवतमाळ3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका माथेफिरु तरुणाने शहर पोलिस ठाण्यात सुमारे तासभर चांगलाच धुडगुस घातला. बुधवारी दुपारी घडलेल्या या प्रकारामुळे शहर पोलिस ठाण्यात हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

पवन कापशीकर रा. चांदूर रेल्वे असे त्या माथेफिरु तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सुहास उईके या पोलिस कर्मचाऱ्याने शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पवन हा स्टेट बँक चौक परिसरात एका व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत होता. त्यासंदर्भात माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जावुन पवनला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्याच्याजवळून एक बनवुन घेतलेले त्रीशुळाच्या आकाराचे धारदार शस्त्र जप्त करण्यात आले. मात्र त्यानंतर त्या तरुणाने पोलिस ठाण्यात चांगलाच धुडगूस घातला. दरम्यान ठाणेदार नंदकुमार पंत पोलिस ठाण्यात आले. त्यांनी संबंधीत तरुणाच्या नातेवाईकांना पोलिस ठाण्यात बोलावले.

यावेळी पवनीचा भाऊ पोलिस ठाण्यात आला. त्याने पवनची मानसिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत त्याच्या उपचाराची काही कागदपत्रे पोलिसांना दाखवली. ही सर्व परिस्थिती पाहुन शहर पोलिसांनी पवन कापशीकर याच्याविरुद्ध आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला. नंतर सूचनापत्र देत भावाच्या स्वाधीन करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...