आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॅब:मातोश्रीत अटल टिंकरिंग लॅब सुरु

पुसद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर येथील मातोश्री विद्यालयात दि. २० ते ३० एप्रिल दरम्यान शालेय विद्यार्थ्यांकरिता दहा दिवसीय व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केले होते. वर्ग पहिली ते दहावी पर्यंत सुमारे ३१५ विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या शिबिरात, संगीत, चित्रकला, हस्तकला, बौद्धिक खेळ व मैदानी खेळ आणि नृत्य इत्यादी विषयाचे मार्गदर्शन करण्यात आले. या व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोपीय कार्यक्रम व अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कार्यक्रमाचे उद््घाटक आमदार इंद्रनील नाईक, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष दिगंबर जगताप, कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे तर प्रमुख अतिथी म्हणून प.स.पुसदचे गटशिक्षण अधिकारी संजय कांबळे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष राधेश्याम जंगीड, सरपंच आशिष काळबांडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या मनोगतात मातोश्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी शिस्तीचे व एकंदरीत शैक्षणिक प्रगतीचे कौतुक केले.याप्रसंगी आयोजित शिबिरामध्ये मार्गदर्शन करणाऱ्या तज्ञ प्रशिक्षकांचा, योगशिक्षकांचा व शाळेतील विविध क्षेत्रातील प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...