आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चेबांधणी:आमदाराच्या अर्धांगिनी बनणार पुसद नगरपालिकेच्या नगराध्यक्षा?

पुसदएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी नगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता जवळपास सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाशिवाय जाहीर झाला आहे. त्यासोबतच महिलांसाठी राखीव पन्नास टक्के आरक्षण देखील जाहीर झाले आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत माजी कॅबिनेट मंत्री मनोहर नाईक यांच्या अर्धांगिनी अनिता नाईक यांना मतदात्यांनी निवडून दिले होते. नगरपालिकेचे समीकरण लक्षात घेता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना मिळून सत्ता स्थापन झाली होती. त्यामुळे नगराध्यक्षपदी सर्वानुमते अनिता नाईक यांची निवड करण्यात आली होती. आता त्यांचे वय लक्षात घेता नगराध्यक्षा पदाचे दावेदार कोण असणार याकडे शहरातील मतदात्यांचे लक्ष लागून राहिले आहे. असे असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्याकडे पाहिल्या जात आहे. मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणात उभे केल्यास त्यांना निवडून देऊ असेही कार्यकर्त्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाल्या आहे.

आगामी न.प. निवडणुकीसाठी आता एकूण पंधरा प्रभाग राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत ३१ वार्डामध्ये सोळा महिला व पंधरा पुरुष निवडून द्यायचे आहे. त्यासाठी मोर्चेबांधणीला देखील सुरुवात झाली आहे. सर्वात मोठा वार्ड असलेल्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये ‘अ’ मध्ये सर्वसाधारण महिला, ‘ब’ मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण ज्यात पुरुष व महिला असे समीकरण जोडले गेले आहे. लोकसंख्येचा कल पाहता पन्नास टक्के महिला आरक्षण मिळाल्याने यंदाच्या निवडणुकीत १६ महिला निवडून द्यावा लागणार आहेत.

त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम संपल्यानंतर पुसद न.प.चे नगराध्यक्ष पदाचे दावेदार कोण असणार याची उत्सुकता लागली आहे. यंदाच्या निकालानंतरही महिला नगराध्यक्ष होणार असल्याचे भाकित जनतेकडून वर्तवल्या जात आहे‌. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार कोण असणार याकडे मतदारांचे लक्ष लागलेले असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षा होणार अशी चर्चा बंगल्यात सुरू झाली आहे. मागील निवडणुकीत भाजपला पाहिजे तसे यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपची एक हाती येणारी सत्ता निसटून गेली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केंद्रात व राज्यात राजकारण लक्षात घेता भाजप गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. भाजपतर्फे महिला नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत डॉ. रूपाली जयस्वाल प्रबळ दावेदार असल्याचे भाजप गटातून जोरदार चर्चा सुरू आहे. तर राष्ट्रवादी व काँग्रेस देखील रिंगणात उतरणार असून परस्पर विरोधी कोण राहणार याकडे लक्ष लागले आहे.

माझी नगराध्यक्षा बनण्याची इच्छा नाही पुसद मतदारसंघांमध्ये माझी काम करण्याची इच्छा आहे. मला जनसंपर्क करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मी फिरत आहे. जनतेची संवाद साधने त्यांचे अडीअडचणी जाणून घेणे मला आवडत आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये माझी नगराध्यक्ष पदावर बसण्याची काहीही इच्छा नाही. पक्षाचे आमदार यांनी ठरवावे कोणाची इच्छा आहे. पण माझी नगराध्यक्षा पदावर बसण्याची इच्छा नाही. मोहिनी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या.