आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढला लंम्पी:लम्पी नियंत्रणासाठी आमदार निधीतून उपाययोजना

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पशु रुग्णालयातील कचरा पालिकेच्या ट्रॅक्टरमध्ये संकलित करुन जंगल परिसरालगत असलेल्या डम्पिंग यार्ड वर टाकण्यात येत आहे. यामध्ये लम्पीची लागण झालेल्या जनावरांच्या मल-मुत्राचाही समावेश आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने डम्पिंग यार्डमधील कचऱ्यामुळे जंगलातील प्राण्यांनाही लम्पीचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला असल्याची गंभीर बाब पशुप्रेमींनी निदर्शनात आनुन दिली आहे. यावेळी आमदार मदन येरावार यांनी प्रशासनाने तातडीने यासंदर्भात उपाययोजना कराव्या त्यासाठी आवश्यक निधी माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करुन देतो अशा सुचना केल्या.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यात जनावरांवर लम्पीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता शहरात दरदिवशी लागण झालेली जनावरे आढळुन येत आहे. त्यामुळे यासंदर्भात तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात आमदार मदन येरावार यांना पशुप्रेमी तरुणांनी निवेदन दिले. त्यात मोकाट जनावरांवर ही लम्पी आजाराची लक्षणे दिसत आहे. अशा जनावरांना पकडुन त्यांना रुग्णालयात किंवा कोंडवाड्यात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार शक्य असला तरी जनावरे पकडण्याची यंत्रणा पशु रुग्णालयाकडे उपलब्ध नाही. जिल्हा पशु रुग्णालयात आवश्यक असलेले कर्मचारी नाहीत. त्यामुळे मोजक्या यंत्रणेवर हे काम सुरू आहे.

पशुप्रेमी या कामात त्यांना मदत करत आहे. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले तंत्रशुद्ध मणुष्यबळ उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहे. त्यातच पशु रुग्णालयातून निघणारा कचरा पालिका शहरातील इतर कचऱ्यासोबत डम्पिंग यार्ड वर टाकत आहे. त्या कचऱ्याद्वारे जंगलातील किंवा कचऱ्यावर येणाऱ्या मोकाट जनावरांना लम्पीची लागण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे नियोजन आवश्यक आहे. जनावरांना नेण्यासाठी रुग्णवाहिका आणि एक्सरे व सोनोग्राफी मशीन देखील रुग्णालयात उपलब्ध करुन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या निवेदनावर आवश्यक ती सर्व कारवाई तातडीने करा अशा सुचना आमदार मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या. त्यात जनावरांना पकडण्यासाठी रेस्क्यू टीम, रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी, नाईट वॉचमन आणि औषधी उपलब्ध करुन द्या. रुग्णालयातुन निघणाऱ्या कचऱ्याचे योग्य नियोजन करा. त्यासाठी आवश्यक असलेला निधी माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करुन देतो. त्यासंदर्भात पत्रही तातडीने द्या असे सांगितले. त्यावर जिल्हाधिकारी यांनी आपण स्वत: रुग्णालयात पाहणी करण्यासाठी जावुन त्या ठिकाणी आवश्यक सुविधा तत्परतेने उपलब्ध करुन देवु असे आश्वासन पशु प्रेमींना दिल्या. यावेळी माजी नगरसेवक नितीन गिरि, बी-काईन्ड पशुमीत्र गृपचे राहुल दाभाडकर, प्रसाद वाजपेयी, अभिजीत गुल्हाणे, बोरा, आदी पशुप्रेमी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...