आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:घाटंजीत मेडीकल व्यावसायिकाची आत्महत्या

घाटंजीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रतिष्ठित असणाऱ्या व सर्वपरिचित वैश्य कुटुंबातील एका मेडीकल व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. ही घटना शहरातील दुर्गा माता वायर्ड येथे बुधवार दि. २२ जुन रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. अभिषेक वैश्य वय २७ वर्ष असे मृताचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काहींनी त्याची माहिती घाटंजी पोलिसांना दिली. त्यावरुन घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्याचे कारण अस्पष्ट आहे.