आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिला परिचरांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या जिल्हा परिषद महिला परिचर महासंघाची बैठक ३१ मार्च रोजी विश्रामगृहात उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी अध्यक्षा गंगुबाई पवार होत्या. दिलीप काळभागे, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती मोळकर, तालुकाध्यक्ष संतोष घुगे, जि.प. महिला परिचर महासंघाच्या सहसचिव लता सेजव, रिना चव्हाण, कोषाध्यक्षा सुरेखा पवार, कार्यकारिणी सदस्या रेखा मनोहर, आशा खिराडे, सविता रुखमाने, विजयमाला पवार, रेखा अंभोरे, लता तायडे, सविता पवार, करुणा भगत यांची प्रमुखा उपस्थिती होती.
या वेळी महिला परिचरांच्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दिलीप काळभागे यांनी परिचरांबाबत शासनाकडून निर्गमित विविध शासन निर्णयाबद्दल माहिती आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर शिवजयंती सजावट स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल आकाश साळवे यांचा महिला परिचर महासंघाच्या वतीने गंगुबाई पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. महिला परिचरांच्या गणवेशाबाबत जि.प. अध्यक्षा चंद्रकांतदादा ठाकरे यांची सर्व महिला परिचरांच्या उपस्थितीत भेट घेण्यात येणार असून त्याबाबत तारीख निश्चित करून सर्वांना कळवण्यात येईल. त्या तारखेला सर्व महिला परिचरांनी भेटीकरिता व महासंघाच्या होणाऱ्या बैठकीला हजर रहावे, असे आवाहन अध्यक्षा गंगुबाई पवार यांनी केले.
बैठकीला रेखा कांबळे, गीता कर्डिले, पार्वती जोगदंड, रेखा गवई, शारदा पाईकराव, शीला गुडधे, प्रयागबाई बाभणे, सुनीता अढागळे, ज्योती गायकवाड, निता वानखेडे, पुष्पा गायकवाड, सविता रुखमाने, रेखा मानमोठे, वंदना वानखेडे, लक्ष्मी गव्हाणे, गोदावरी खंडारे, गीता वानखेडे, लीलाबाई वाघमारे, नंदा इंगळे, अरुणा वानखेडे, आशा पवार, रिना चव्हाण आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.