आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:मारेगावात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाचा अत्याचार

मारेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील अल्पवयीन शाळकरी मुलीला रस्त्याने जात असताना घरात बोलावून अत्याचार केल्याची घटना घडली. घटनेची माहिती पीडितेच्या आईला व परिसरातील नागरिकांना माहिती मिळताच आरोपी पळून गेला. मात्र, मारेगाव पोलिसांनी पाठलाग करून वणी पोलिसांच्या सहकार्याने काही तासात आरोपीला अटक केली. लखन रावत असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास शहरातील १४ वर्षीय विद्यार्थीनी रस्त्याने जात होती. आरोपी लखन रावत (२०) हल्ली मु. मारेगाव याने पीडितेला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

घडलेल्या घटनेने घाबरलेली पीडित मुलगी रडत होती. ओरडल्यास किंवा कोणाला घटनेची माहिती सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी यावेळेस आरोपीने मुलीला दिली. तेवढ्यात त्या ठिकाणी पिडीतीची आई आली आणि घडलेला प्रकार पाहून ती सुद्धा रडत होती. तिच्या रडण्याने शेजारील रहिवासी गोळा होताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याची तात्काळ माहिती पोलिसांना दिली. आरोपी लखन हा येथील भेळ पुरीच्या ठेल्यावर वेटरचे काम करीत होता.

बातम्या आणखी आहेत...