आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअल्पवयीन मुलींचे घरून बेपत्ता होण्याचे प्रमाण तालुक्यात चांगलेच वाढले आहे. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून पळवले जात आहे. आई वडिलांचा विश्वास धुळीस मिळवून त्यांच्या न कळत अल्पवयीन मुली घरून पलायन करू लागल्या आहे. शिक्षण घेण्याच्या वयात मार्ग भटकू लागल्या आहेत. कुणाच्याही भूलथापांना बळी पडून चुकीच्या मार्गाकडे वळू लागल्या आहे. आयुष्य घडवण्याच्या वयात आयुष्य उध्वस्त करू लागल्या आहे. गाव खेड्यातील व गरीब घरातील मुली घरून पळून जाण्याच्या घटना चांगल्याच वाढल्या आहे. अश्यात गुरूवार, दि. ३१ मार्चला तालुक्यातील पळसोनी येथील अल्पवयीन मुलगी कुणालाही न सांगता घरून बेपत्ता झाली. कुटुंबीय शेतात गेल्याची संधी साधून मुलगी घर सोडून निघून गेली. याबाबत तिच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिल्याने पोलिसांनी ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वणी तालुक्यातील पळसोनी येथे वास्तव्यास असलेल्या शेतकरी कुटुंबातील अल्पवयीन मुलगी गुरुवारी अचानक घरून बेपत्ता झाली. ही मुलगी शहरातील एका महाविद्यालयात अकरावीला होती. परिक्षा संपल्याने ती सध्या घरीच रहात होती. आई वडील सकाळीच शेतात गेले. काही वेळानंतर भाऊ सुद्धा डब्बा घेऊन शेतात निघून गेला. दुपारी कुटुंबातील सदस्य घरी परतले तेंव्हा त्यांना मुलगी घरी दिसली नाही. मैत्रिणीकडे गेली असावी म्हणून त्यांनी तिची सायंकाळ पर्यंत वाट बघितली.
पण ती सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यांनी मुलीचा सर्वत्र शोधाशोध सुरु केला. सगळी कडे शोध घेऊनही मुलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांनी अखेर वणी पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या वडिलाने मुलगी घरून बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. पोलिसांनी वडिलांची तक्रार नोंदवून घेत कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मुली बेधुंद मनाच्या लहरी प्रमाणे वागू लागल्या आहेत. कुणाच्याही कुठल्याही आकर्षणाला बळी पडून त्या स्वप्न रंगवू लागल्या आहेत. कुठल्याही प्रलोभनाकडे आकर्षित होऊन त्या स्वप्नवत दुनियेची वाट धरू लागल्या आहेत. कुटुंबीयांचा विश्वासघात करून मुली घर सोडून जाऊ्लागल्याने पालकांच्या चिंता चांगल्याच वाढल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.