आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:मिसिंगचा तपास गंभीर गुन्ह्यासदृश करावा; एसपी डॉ. पवन बन्सोड यांचे अंमलदारांना निर्देश

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात मिसिंग प्रकरणे मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येताच पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी शनिवार, दि. ५ नोव्हेंबरला पोलिस मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक अंमलदार उपस्थित होता. यापुढे कोणतेही मिसिंग प्रकरण पोलिस ठाण्यांच्या स्तरावर प्रलंबित राहणार नाही, या करिता मिसिंग प्रकरणाचा तपास गंभीर गुन्ह्यासदृश्य पद्धतीने करावा, असे निर्देश एसपी पवन बन्सोड यांनी दिले.

जिल्ह्यात मागील पाच वर्षात हरविलेले, पळवलेल्या इसमांसंबंधी नोंद प्रकरणाचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यानंतर हरविलेल्या मुली, महिला यांचा शोध घेण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे, हरविलेल्या मुली, महिलांना हरवल्यानंतर कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते, घरून निघून आलेल्या, हरविलेल्या व अपहरण करण्यात आलेल्या मुली, महिलांना समाजकंटक कसे हेरतात, त्यांचा साधेपणा, भोळेपणाचा फायदा घेऊन वाम मार्गाला कसे लावतात, यावर चर्चा करून आढावा घेतला.

लहान शहरातून अल्पवयीन मुली, महिला, काही वेळा घरगुती वाद, प्रेम संबंधातील खोटे आमिष किंवा फिल्मी दुनियेच्या आभाशी जगतात स्वत:ला भारावून घेऊन घर सोडतात व त्यांचा भ्रमनिरास होवून त्या विविध विकृत कृत्यांना बळी पडतात अशा घटनाही अनेकदा घडल्या आहे.त्यामुळे हरविलेल्या महिला, मुलींना अशा गोष्टीपासून वाचविण्यासाठी त्यांचा शोध घेणे किती आवश्यक आहे, त्यांना शोधण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत याबाबत एसपी बन्सोड यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या स्तरावर एक अंमलदार मिसिंग हेड कामकाज पाहण्यासाठी नेमण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...