आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगाचा पोशिंदा डोळ्यादेखत पुराने सर्वस्व हिरावून नेल्याने हतबल झाला. पुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले पण त्याचा अहवाल तयार होईल, मग तो पुढे जाईल, तोपर्यंत जगायचं कस या विवंचनेत शेतकरी सापडला असुन त्याला कोणीही वाली उरला नसल्याचे चित्र दिसत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावली आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राज ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना जिल्ह्यात सुरू केली आहे. सोमवार, दि. १ ऑगस्टपासून योजना शेतकऱ्यांकरिता अकोली येथे केले असून स्थानिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन मनसेच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत.
वणी, मारेगाव आणि झरी जामणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. सुरुवातीला पाणी न आल्याने दुबार पेरणी करावी लागली. तर आता झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीला पूर येऊन शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. या योजनेमध्ये पुरामुळे ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना रब्बी हंगामात उभारी मिळावी, म्हणून राजू उंबरकर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. वणी उपविभागातील जवळपास ६०० ते ७०० शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे खते कीटकनाशके, यांसह इतर शेती साहित्य शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच नेऊन दिले जाणार आहे. याशिवाय दोन टप्प्यांत पाच, पाच हजार, असे एकूण १० हजार रुपये या योजनेत सामावून घेतलेल्या शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. जेणेकरून अशा परिस्थितीत तो शेतकरी कमीत कमी उभा झाला पाहिजे आणि त्याचे मनोबल वाढले पाहिजे. जगाचा पोशिंदा संकटात असताना मदत तर दूरच पण प्रशासन त्याच्यापर्यंत पोहोचलेले देखील नाही.
शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे त्याला उभारी देण्याचा एक छोटासा हा प्रयत्न आहे, असे राजू उंबरकर यांनी सांगितले. मनसेने ७ शेतकरी दत्तक घेतलेलेच असुन त्यांना बी बियाणे, खते पोहोचवलेले आहेत. ही योजना जिल्ह्यात पहिला टप्पा वणी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात राबवण्यात येत असल्याचेही उंबरकर म्हणाले. आतापर्यंत प्रशासनच काय कोणताही लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत अद्याप पोहचला नाही. पण मनसेने जी मदत केली त्या मदतीमुळे आम्ही थोडेफार का होईना, परिस्थितीतून सावरण्याचे बळ मिळाल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.