आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षांची शिक्षा:अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला तीन वर्षांची शिक्षा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने तीन वर्षाची शिक्षा आणि दंड ठोठावला. हा निर्णय शनिवार, दि. १७ डिसेंबरला वि अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावला असून प्रफुल्ल सहारे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, यवतमाळ तालुक्यातील एक आठ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २० नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी घरासमोर खेळत होती. यावेळी प्रफुल्ल सहारे नामक युवकाने त्या अल्पवयीन मुलीला परिसरातील एका बंद असलेल्या शाळेजवळ नेवून विनयभंग केला. ही बाब कुटुंबीयांना सांगू नको पुढल्या वेळी वीस रूपये देण्याचे आमिष दिले. तसेच कुटुंबीयांना सांगितल्यास मारण्याची धमकी दिली.

याबाबतची माहिती अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. त्यानंतर प्रफुल्ल सहारे याला अटक करून प्रकरणाचा संपूर्ण तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. सदर प्रकरण वि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डब्ल्यू. चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणीला आले. यावेळी न्यायालयाने दोन साक्षीदार तपासले, ज्यामध्ये अल्पवयीन मुलगी आणि तक्रारदार या दोघांची साक्ष महत्वाची ठरली. त्यावरून न्यायालयाने आरोपी प्रफुल्ल सहारे याला तीन वर्ष शिक्षा आणि दंड ठोठावला.

बातम्या आणखी आहेत...