आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरकवडा न्यायालयाने सुनावला निकाल‎:विनयभंग; आरोपीस एक‎ वर्षाचा सश्रम कारावास‎

पांढरकवडा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुकानात साहित्य खरेदीसाठी गेलेल्या‎ महिलेचा विनयभंग करणाऱ्या‎ आरोपीस पांढरकवडा न्यायालयाने‎ एक वर्ष सश्रम कारावासासह दंडाची‎ शिक्षा ठोठावली. वणी तालुक्यातील‎ बेलोरा येथे घडलेल्या या प्रकरणात‎ पांढरकवडा येथील अति सत्र‎ न्यायाधीश पी. श्री. नाईकवाड यांनी हा‎ निर्णय दिला. प्रभाकर मनोहर डंभारे रा.‎ बेलोरा असे आरोपीचे नाव आहे.‎ वणी तालुक्यातील बेलोरा या‎ गावामध्ये पीडित महिलेचा विनयभंग‎ केला. २७ ऑक्टोबर २०१५ रोजी‎ घडलेल्या या घटनेत जाब विचारला‎ असता जातीवाचक शिविगाळ देखी‎ केली होती. या प्रकरणात पीडित‎ महिलेने २८ ऑक्टोबर २०१५ रोजी‎ शिरपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार‎ दाखल केली होती.

या तक्रारीवरून‎ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्याला‎ अटक करत वणीचे उपविभागीय‎ पोलिस अधिकारी माधव एन. गिरी‎ यांनी प्रकरण न्यायालय केळापूर येथे‎ न्यायप्रविष्ट केले. सुनावणीदरम्यान‎ आरोपीवरील दोष सिद्ध झाल्याने‎ पांढरकवडा येथील अति. सत्र‎ न्यायाधीश पी. श्री. नाईकवाड यांनी‎ आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावास‎ व २ हजार रुपये दंड ठोठावला. या‎ प्रकरणात फिर्यादी पक्षाची बाजु सहा.‎ सरकारी अभियोक्ता रमेश डी. मोरे‎ यांनी मांडली.‎