आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बहुप्रतीक्षित बदल्यांची यादी अखेर शनिवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रसिध्द झाली. जिल्ह्यात कार्यरत साडेसात हजाराहून अधिक शिक्षकांपैकी एक हजार ८१० शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले असून, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या २१० आहे. दरम्यान, बदलीसाठी इच्छुक आणि पात्र असणार्या शिक्षकांचा जीव भांड्यात पडला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होवू शकल्या नाही. यंदा मात्र, प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे संकेत शासनाने दिले होते. त्यानुसार वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. अशात बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने ग्रामविकास विभागाने आदेश दिले होते. या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यंवशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र शुक्रवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी निर्गमित झाले होते. या पत्रानुसार पंचायत समिती गट शिक्षणाधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
त्यानुसार शनिवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी दोन्ही याद्या ऑनलाईन पद्धतीने जाहीर केली. यात बदली पात्र एक हजार ८१० आणि अधिकार पात्र २१० शिक्षक आहेत. ह्या याद्या तात्पुरत्या स्वरूपात असून, शिक्षकांना ह्यावर आक्षेप नोंदवता येणार आहे. एकाच शाळेत पाच वर्षे सेवा केलेले प्राथमिक शिक्षक आणि सोपे अथवा अवघड क्षेत्रात दहा वर्षे सेवा दिलेल्या शिक्षकांचा समावेश आहे. तर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांमध्ये अवघड क्षेत्रात किमान तीन वर्षे सेवा दिलेल्यांचा समावेश आहे. आता किती आक्षेप नोंदवल्या जाणार हे लवकरच कळणार आहे.
रिक्त जागांची माहिती होणार अपलोड
रिक्त जागांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. बदल्यांच्या वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग एक आणि संवर्ग दोन या प्रवर्गातील शिक्षकांना स्वत:ची बदली संदर्भातील माहिती पोर्टलवर टाकावी लागणार आहे. दरम्यान, ही माहिती पोर्टलवर प्रसिध्द झाल्यावर संवर्गातील बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी प्रसिध्द होणार आहे. तद्नंतर पुढे नियमानुसार बदलीची प्रक्रिया होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.