आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत आवड निर्माण व्हावी, स्वयंअध्ययनातून गुणवत्ता विकास व्हावा, सोबतच स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी ह्या उद्दिष्टाने शालेय अभ्यासक्रम तथा सामान्य ज्ञानाशी सांगड घालणाऱ्या महादीप परीक्षेच्या सातव्या फेरीचा पेपर सोमवार, दि. ५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता शहरातील अँग्लो हिंदी हायस्कूलमध्ये होणार आहे. परीक्षेत पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान वारीची संधी मिळणार आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग दरवर्षी महादीप परीक्षा घेत आहे. या परीक्षेत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. शाळास्तरावर तीन फेऱ्या होणार होत्या. पाहिली फेरी ७ डिसेंबर २०२२ ला झाली असून, उर्वरीत टप्प्या-टप्प्याने पारसुद्धा पडल्या आहेत.
यात प्रामुख्याने महाराष्ट्र, भारत आणि जग, विज्ञान व सामान्य ज्ञान, तसेच मराठी, इंग्रजी भाषा, गणित, बुद्धिमत्ता आदी अभ्यासक्रम होता. प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेण्यात आली आहे. प्रत्येक फेरीत टक्केवारीने गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा सातव्या फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. सहाव्या फेरीतून ७० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय अंतिम फेरीत समावेश करण्यात आला आहे. यात पाचवी ते दहावीचे २३६ आणि सातवी ते आठवीचे २२७, ऊर्दू १०० असे मिळून ५६३ विद्यार्थी अंतीम फेरीसाठी पात्र ठरले आहे
आसन क्रमांकांची प्रश्न, उत्तर पत्रिका
महादीप परीक्षेतील पात्र विद्यार्थी वेगवेगळ्या सात फेऱ्यातून आले आहेत. तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये, ह्यासाठी विशेष परिश्रम प्राथमिक शिक्षण विभाग घेत आहे. परीक्षा पारदर्शकपणे व्हावी, ह्या दृष्टीने विद्यार्थ्यांना थेट आसन क्रमांकाची प्रश्नपत्रिका आणि उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. ह्यातील प्रश्न एकच राहणार असून, केवळ क्रम वेगवेगळ्या पद्धतीचा ठेवण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.