आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 चा निकाल:बहुतांश शाळांचा लागला 100 टक्के निकाल; ड्रिमलॅण्ड इंग्लिश स्कूलची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

दिग्रस10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल जाहीर झाला असून जाहीर झालेल्या निकालामध्ये दिग्रस येथील पी. व्ही. चिद्दरवार ड्रिमलॅण्ड इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल यंदाही शंभर टक्के लागला. त्यात प्राप्ती गणेश बहादूरे हिने ९८.८० टक्के गुण प्राप्त करून प्रथम स्थान मिळविले. श्रेया वैभव ढाले हिने ९६.८० टक्के गुण प्राप्त करून द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच संपदा अजय गवळीकर हिने ९६.४० टक्के व प्रियांशु नरेश कराळे याने ९६.४० टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

शाळेतील इतर गुणवंत मृणाल संजाब कष्टे ९६.२०, स्नेहल चक्रधर जिंतुरकर ९५.६०, मंथन कल्पेश फुलढाले ९५.६०, ऋतुजा पांडुरंग महल्ले ९४.८०, निवृत्ती सुनील नेमाडे ९४.६०, क्रिशल विलास कराळे ९४.२०, हर्षद ताराचंद राठोड ९३.४० शाळेतील एकूण २५ विद्यार्थ्यांपैकी २१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. शाळेच्या संचालक मंडळाने कोरोनाच्या कठीण प्रसंगी मुलांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिली तसेच टेस्ट सिरिज, सॉफ्टवेअर, ऑडिओ व्हिडिओ शिक्षण पद्धतीचा सातत्याने पाठपुरावा करून वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक अनिल भारती, मुख्याध्यापिका पुष्पा गावंडे (पाटील), उपमुख्याध्यापक गोविंद काळे व शिक्षकवर्ग यांनी पुढाकार घेतला. यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांना दिले.

महर्षी विद्यालयाचा निकाल शंभर टक्के
उमरखेड तालुक्यातील अति दुर्गम भाग म्हणून ओळखले जाणारे निगंनुर येथील महर्षी दयानंद सरस्वती विद्यालय मधील विद्यार्थीनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला तर प्रथम प्रशांत प्रदीप पवार ८९.४० टक्के या विद्यार्थ्यांनी विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. तर द्वितीय क्रमांक क्रिश अमोल राठोड ८८.६० टक्के आहे. तृतीय क्रमांक सतिका राजुसिंग राठोड हिने मिळवला आहे.

एकुण ५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ३२ विद्यार्थ्यांना प्रविण्य श्रेणी मिळाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कवाने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच शिक्षकवृंद जाधव, दुधेवार, कहुळकर, तास्के, ढाकरे, देशमुख, या सर्वांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. मख्याध्यापक व शिक्षकवृंदानी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या५ दहावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली.

वेदिका जाधव ही विभागातून शंभर टक्के गुण घेणाऱ्या आठ विद्यार्थ्यांपैकी एक
लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील विद्यार्थिनी वेदिका भरत जाधव ही अमरावती विभागातून १०० टक्के गुण मिळवणाऱ्या आठ विद्यार्थ्यांपैकी एक ठरली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी घोषित करण्यात आला. या निकालात लिटिल बर्ड इंग्लिश मीडियम हायस्कूल अंड ज्यूनियर कॉलेज सायन्स निकालाची परंपरा कायम राखत शंभर निकाल दिला आहे. वेदिका भरत जाधव ही शंभर टक्के गुण मिळवून ती अमरावती बोर्डातून आठ विद्यार्थ्यांपैकी ठरली आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षकांना दिले.

बातम्या आणखी आहेत...