आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी अटक:अल्पवयीन मुलीवर लादले मातृत्व; आरोपी अटकेत

घाटंजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मांडवा येथील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. नंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण करून मातृत्व लादले. त्या अल्पवयीन मुलीने १९ डिसेंबरला एका गोंडस बाळाला जन्म दिला. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हे नोंद करून आरोपीला अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या मामाकडे राहत होती. त्या ठिकाणी तिचे आरोपी आशिष महादेव मेश्राम वय २० याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते, त्यानंतर आरोपीने मागील दहा महिन्यांपासून पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक शोषण केले.

यात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. मात्र, त्या तरुणाने लग्नास नकार दिला. शेवटी पीडित मुलीने घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. मंगळवार, २० डिसेंबर रोजी पीडितेने ग्रामीण रुग्णालयात एका गोंडस बाळाला जन्म दिला. दरम्यान, घाटंजी पोलिसांनी आरोपी आशिष मेश्राम वय २० याला ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत रवानगी केली. या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक सुषमा बाविस्कर, पोलिस उपनिरीक्षक विलास सिडाम, राहुल खंडागळे, विशाल वाढई करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...