आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सराईत गुन्हेगारावर कारवाई:लोंढेवर एमपीडीए कारवाई

आर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाला, धोकादयक, विघातक कृत्य करणारा व गुंडागर्दी करून दहशत पसरवणाऱ्या एका कुख्यात गुंडावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गजानन पुंडलिक लोंढे वय ३३ वर्ष रा. शास्त्रीनगर आर्णी असे एमपीडीए कारवाई केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

आर्णीत घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणे, जबरदस्तीने लुबाडणे, हत्याराने मारहाण करणे, जखमी करणे, गर्दी करणे, मारामारी घडविणे, दमदाटी करणे असे बेकायदेशीर कृत्य गजानन हा सराईतपणे करित आहे. अशा रितीने त्याने आर्णी शहरात प्रचंड दहशत निर्माण केली. डी, चोरी, दरूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल आहे. एकूण १५ दखलपात्र गुन्हे नोंद आहे. गजानन याला मोकळे राहू दिल्यास स्थानिक सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका पोहोचण्याची दाट शक्यता होती.

त्यामुळे दाखल गुन्ह्याचा सखोल अभ्यास करून गजानन याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये प्रस्तावित कारवाई करण्यात आली आहे. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी दारव्हा आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वात आर्णी ठाणेदार पीतांबर जाधव, प्रदीप परदेशी, किशोर खंडार, राहुल गोरे, विजय चव्हाण, योगेश सुंकलवार, मनोज चव्हाण यांनी पूर्णत्वास नेली आहे.

बातम्या आणखी आहेत...