आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी बनवून त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करीत स्थानबद्ध करण्यात येत आहे. नुकतेच उमरखेड शहरातील सराफा लाईन परिसरातील सराईत गुन्हेगार गजानन डहाळे वय २४ वर्ष याच्या विरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली.
नव्याने उदयास आलेल्या नवनवीन टोळ्या आणि त्या टोळ्यात उडणारे खटके असे अनेक प्रकारे समोर येत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणार्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी व त्यांची गुन्हेगारी रोखण्यासाठी यवतमाळ उपविभागात कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला.
वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी सराईत गुन्हेगारांची यादी बनवून त्याच्यावर ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात येत आहे. उमरखेड परिसरातील सराईत गुंड गजानन डहाळे याच्या विरोधात उमरखेड ठाण्यात सन २०१७ पासून शरिर, संपत्ती विषयक गुन्हे दाखल आहे. त्याचबरोबर भरधाव वेगाने वाहन चालविणे, दारुचे नशेत सार्वजनिक शांतता भंग करणे, कट करुन खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्र बाळगणे, अश्लील शिवीगाळ करणे, सामाजिक सलोखा बिघडवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे नोंद आहे. त्याच्या या गुन्हेगारी कारवायांमुळे उमरखेड शहर व परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. त्याच्या विरुध्द आजपावेतो केलेल्या प्रतिबंधक कारवाईचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही.
उलट तो अश्या प्रकारचे गुन्हे करीत होता. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था कायम राहावी, याकरता त्याच्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली उमरखेड ठाणेदार अमोल माळवे यांनी एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार करीत तो जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मान्यता मिळताच दि. २ डिसेंबरला गजानन डहाळे याला वर्ष भरासाठी स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, सहा पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल माळवे, कर्मचारी विजय पतंगे, नितीन खवडे, राहुल गोरे यांनी पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.