आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:जेसीबीने खोदकाम केल्याने महावितरणची केबल नादुरुस्त; दिग्रस महावितरणची पोलिसांत तक्रार दाखल

दिग्रस15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका जेसीबीने नव्या बसस्थानक जवळील आरोग्यधाम हॉस्पिटलजवळ खोदकाम केल्याने तेथील भूमिगत केबल नादुरुस्त झाली. त्यामुळे महावितरण विभागाला मोठे नुकसान झाले असून संबंधित जेसीबी चालक व मालकावर कारवाई करण्यासाठी दिग्रस महावितरणने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सध्या शहरातील मानोरा चौक ते चिंचोली क्रमांक २ या रस्त्याचे काम सुरू आहे. दरम्यान दि. १० जून रोजी जेसीबी क्रमांक एमएच-२९-बीसी-६७३६ ने खोदकाम केले. हे खोदकाम करतांना त्यांनी भूमिगत असलेली केबल सुरक्षित राहील याची दक्षता घेतली नसल्याने ती भूमिगत केबल नादुरुस्त झाली. जेसीबीने केलेल्या या कृत्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले असून त्यादिवशी परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जेसीबीने केलेल्या या खोदकामामुळे महावितरण विभागाला ३ लाख ४२ हजार ४६८ रुपयांचे नुकसान झाले. त्यामुळे जेसीबी चालक व मालकाव कारवाई करावी, अशी मागणी अभियंता रितेश बोबडे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...