आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक:पोफाळी येथील मोहर्रम ताजिया ठरले सामाजिक ऐक्याचे प्रतीक

पोफाळी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तब्बल शंभर वर्षांपासून पोफाळी येथील मोहर्रम ताजिया हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक ठरला आहे. या उत्सवाला दरवर्षी पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात. मानवतेपेक्षा कोणताही धर्म मोठा नाही प्रत्येक धर्माने मानव कल्याण सांगितले आहे. केवळ अंध अनुयायी धर्माचे सोयीचे अर्थ काढून वागतात त्यामुळे सामाजिक विषमता वाढीस लागते मात्र याला अपवाद ठरला तो हा पोफाळी येतील मोहरम.

आजही समाजात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र सलोख्याने राहत असल्याचे चित्र गोखळी सारख्या गावात बघायला मिळते. गावातील दहा दिवसाचे मोहर्रम ताजिया हे सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. हजारो हिंदू मुस्लिम भाविक मोहर्रम उत्सवात सामील होतात. या उत्सवात सवारी आणि डोला व घोड्यावर यांची प्रतिकृती बनवून नाचवण्याची परंपरा आहे. यास अनेक भाविक विविध वेशभूषा करून उत्साह डफलीच्या तालावर नसताना तल्लीन होताना दिसतात हजारोंच्या संख्येने आलेले भाविक आपला नवस पूर्ण करून घेतात. सर्व स्तरातील बांधव एकत्र येऊन सायंकाळी गावातून सवारी डोला प्रतिकृती एकत्र आणून भेटीसाठी भेटीगाठी घेतात. त्यानंतर उत्सवाची सांगता केली जाते. या उत्सवात दरम्यान अनुचित प्रकार घडू नये या दृष्टीने पोफळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांनी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

बातम्या आणखी आहेत...