आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा व्यवस्थापन:शाळा क्रमांक दोनमध्ये‎ पालिका स्थापना दिन साजरा‎

घाटंजी‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिकेच्या स्थापनेला ७५ वर्षे‎ पूर्ण झाल्यामुळे पालिकेचा अमृत‎ महोत्सवी स्थापनादिन शाळेमध्ये‎ विविध कार्यक्रम घेऊन साजरा‎ करण्यात आला. अध्यक्षस्थान‎ शाळा व्यवस्थापन समितीचे‎ अध्यक्ष देशमुख यांनी भूषवले.‎ प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक‎ अरुण पडलवार उपस्थित होते.‎ यावेळी संस्थापक अध्यक्ष स्व.‎ सहदेवजी भारती व माजी‎ नगराध्यक्ष स्व. विठुबापूजी चौधरी‎ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण‎ करण्यात आले. मुख्याध्यापक‎ पडलवार यांनी विद्यार्थ्यांना स्व.‎ सहदेवजी भारती व स्व. विठू‎ बापूजी चौधरी यांच्या कार्याबाबत‎ माहिती दिली.

विद्यार्थी कृष्णा‎ उमेश माकडवार याचा वाढदिवस‎ साजरा करण्यात आला.‎ पालिकेच्या स्थापना दिनानिमित्त‎ रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व‎ वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली.‎ या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी‎ शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका वेणू‎ मेश्राम, वृषाली अवचित , सोनू‎ पेटेवार तसेच जेष्ठ शिक्षक संजय‎ गोलर, कृष्णा मडावी, वसंत‎ सिडाम, तुषार बोबडे, नरेंद्र राठोड,‎ सेवक नारायण डहाके व कांचन‎ मेश्राम यांनी परिश्रम घेतले.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व‎ आभार प्रदर्शन तुषार बोबडे यांनी‎ केले.‎

बातम्या आणखी आहेत...