आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:खुल्या जागेच्या वादातून 50 वर्षीय व्यक्तीची हत्या ; कळंब तालुक्यातील मुसळ येथील घटना

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरा शेजारच्या खुल्या जागेच्या वादातून दोघांनी एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील मुसळ येथे रविवारी रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास घडली. लक्ष्मण नथ्थूजी वाघाडे असे मृताचे नाव आहे. तर मारेकरी मंगेश किसनाजी शेंद्रे (३५) आणि सूरज गणेश भोयर (२३) रा. मुसळ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यातील एकाला न्यायालयाने दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे. प्राप्त माहितीनुसार, कळंब तालुक्यातील मुसळ येथे लक्ष्मण वाघाडे आणि मंगेश शेंद्रे, सूरज भोयर घराशेजारी राहात असून होळी सणा पासुन खुल्या जागेसाठी वाद सुरु होता. रविवारी रात्री ९.३० च्या सुमारास लक्ष्मण वाघाडे घरासमोरील वरांड्यात खाटेवर झोपून होता तर त्याचे कुटुंबीय घरात जेवण करीत होते. यावेळी मुलगा स्वप्नील वाघाडे याला भांडणाचा आवाज आल्याने मुलगा, पत्नी घराबाहेर आले. यावेळी मंगेश शेंद्रे आणि सूरज भोयर दोघे हातात काठ्या घेऊन शिवीगाळ करीत मारहाण करीत होते. त्यामुळे मुलगा व आई भांडण सोडवण्यासाठी गेले असता, त्यांनाही मारहाण करण्यात आली. लक्ष्मण वाघाडे यांच्या डोक्यावर काठीचा मार बसल्याने ते खाली पडले. लक्ष्मण वाघाडे यांना रक्तबंबाळ अवस्थेत बघून दोन्ही मारेकऱ्यांनी पळ काढला. काही वेळातच गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण वाघाडे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात स्वप्नील वाघाडे याने तक्रार दिली. पोलिसांनी मारेकऱ्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. यातील मारेकरी सुरेश भोयर आणि मंगेश शेंद्रे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मारहाणीत सुरेश भोयर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...