आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभियंता ग्रुपमार्फत यावर्षी अभियंते व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळीनिमित्त पाडवा पहाटचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम निवृत्त अभियंता भवन यवतमाळ येथे घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी गायक अभियंता अतुल शिरे व गायिका अर्चना ठाकरे यांनी कार्यक्रमात भक्ती गीत, भावगीत, अभंग तसेच गझल इत्यादीचे सुश्राव्य गायन सादर केले.या संगीत मैफलीमध्ये गायकांना विशाल शेंदरकर, विशाल रामनगरिया, नरेंद्र पाटणे, अजिंक्य शिंदे यांनी सुरेख साथ संगत केली. यावर्षी पहिल्यांदाच अभियंता ग्रुप मार्फत ही संगीतमय मेजवानी देण्यात आली. पाडवा पहाट या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा व हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न अभियंता ग्रुप मार्फत करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने झाली नंतर अजित कडकडे यांच्या निघालो घेऊन दत्ताची पालखी हे गाणे अतुल शिरे यांनी उत्कृष्टरित्या सादर करून वातावरण भक्तिमय केले. सुप्रसिद्ध गायक अरुण दाते व सुमन कल्याणपुरकर यांचे शुक्रतारा मंद वारा या युगलगीताच्या सादरीकरणामुळे श्रोते भाव विभोर झाले. त्यानंतर शंकर महादेवन यांचे सूर निरागस हो हे गीत अतुल शिरे यांनी सादर केले. पंडित भीमसेन जोशी यांच्या बाजे मुरलिया या भक्ती गीताने कार्यक्रमाची रंगत वाढवली. हरिहरन यांची फुल हे चांद है ही गझल भाव खाऊन गेली.
कार्यक्रमाच्या शेवटी अतुल शिरे यांनी लागा चुनरी मे दाग//" ही भैरवी प्रस्तुत करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला अभियंता ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश कोळसे, सचिव श्रीकांत खराबे, उपाध्यक्ष राम घोटेकर,प्रवीण येंडे, कोषाध्यक्ष प्रदीप पवार तसेच माजी अध्यक्ष दिनेश गायकवाड, प्रवीण पांडे, श्रीकांत मुनगिनवार, माजी उपाध्यक्ष प्रसाद डूबे, नितीन अंगाईतकर, रवी ढगे, सहसचिव आशिष शिरभाते, पूजा खराबे तसेच निवृत्त अभियंता मंडळाचे पदाधिकारी अभियंता अणे, अशोक तिखे तसेच बहुसंख्य अभियंते व त्यांचे कुटुंबीय आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित होते. संचालन व आभार अभियंता विलास चावरे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.