आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापतीसोबत झालेल्या घरगुती वादातून पत्नीसह १६ वर्षीय मुलीने नदीत उडी घेवून आत्महत्या केली. ही दुर्देवी घटना उमरखेड तालुक्यातील भवानी परिसरात शुक्रवार, दि. ३ जूनला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नंदा किशोर वानखेडे वय ४० वर्ष आणि साक्षी वानखेडे वय १६ वर्ष रा. भवानी ता. उमरखेड अशी मृत माय-लेकीची नावे आहे. उमरखेड तालुक्यातील भवानी या गावी किशोर वानखेडे हा पत्नी, मुलगी आणि दोन मुलांसोबत राहतो. गेल्या काही दिवसापासून किशोर याने पत्नी नंदा हिच्यासोबत घरगुती कारणावरून वाद सुरू होते. अशातच गुरुवारी पती-पत्नीत पुन्हा वाद निर्माण झाला. त्या वादाचा राग सहन न झाल्याने नंदा हिने १६ वर्षीय मुलगी साक्षी हिला सोबत घेऊन रात्रीच्या सुमारास भवानी पासून जवळ असलेल्या नदीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास गावकऱ्यांच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दराटी पोलिसांनी भवानी गाठून परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. दरम्यान घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविले. मृत नंदा वानखेडे हिच्या पश्चात दोन मुले असून नंदाच्या मृत्यूने त्यांचे मायेचे छत हरवले आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दराटी पोलिस करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.