आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉकीचे जेतेपद:पुरुषात नागपूर व महिलांत यवतमाळला हॉकीचे जेतेपद; मॅन ऑफ दी सिरीजचे रोशनी कुपाले व सुनील कटोते मानकरी

यवतमाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील दिवंगत राष्ट्रीय व नामवंत हॉकी खेळाडूच्या स्मृतिप्रीत्यर्थ हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय महिला व पुरुष हॉकी स्पर्धेतील पुरुषांच्या गटात नागपुरच्या ध्यानचंद हॉकी क्लबने तर महिला गटात यजमान बी यवतमाळ संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

स्थानिक पोस्टल ग्राउंड मैदानावर प्रचंड उष्णता ओकत असलेल्या सूर्याच्या उष्ण तापमानात राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेतील पुरुषातील अंतिम सामन्यात ध्यानचंद हॉकी क्लब नागपूर विरुध्द यजमान”ए यवतमाळ संघाच्या दरम्यान झालेल्या सामन्यात नागपूर संघांनी १-० अशा गोलने मात करीत विजेतेपद पटकाविले. तर उपविजेता ए यवतमाळ संघ ठरला. महिलांच्या अंतिम सामन्यांत यवतमाळ ‘बी संघांनी यजमान यवतमाळ ए संघाचा एक -शून्य गोलने मात करीत विजेतेपद पटकाविले.

तर उपविजेतेपद यवतमाळ ए संघांनी प्राप्त केला. पुरुष व महिला गटात तिसरा क्रमांक पुरुषात भुसावळ व यजमान बी संघाला व महिला गटात कोल्हापूर व सिटी पोलीस नागपूर या संघांना संयुक्त तिसरा क्रमांक बहाल करण्यात आला. मॅन ऑफ दि सिरीज पुरुषात नागपूरच्या सुनील कटोते तर महिला गटात रोशनी कुपाले यांना बहाल करण्यात आले.

वयक्तीक पुरस्कारा पुरुषात बेस्ट डिफेन्स मयंक यादव, बेस्ट गोलकीपर राजकुमार, बेस्ट बँक फहीम, बेस्ट हाफ कान्हा नागपूर, बेस्ट फॉर वड करण चव्हाण तर महिला मध्ये बेस्ट डिफेन्स, बेस्ट बँक रोशनी कुपाले, बेस्ट गोलकीपर अनंत गायकवाड, बेस्ट हाफ शुभांगी येनोरकर, बेस्ट फॉर वड तनुश्री कडू यांनी पटकाविले.

सर्व यशस्वी संघ व खेळाडूला बक्षीस वितरण सोहळा समारंभाचे अध्यक्ष मिरा फडवीस, प्रमुख अतिथी म्हणून एपीआय स्वप्नील निराळे, फ्लोरा सिंग, माजी फुटबॉल क्रीडा मार्गदर्शक हरिहर मिश्रा, प्रवीण कळसकर, सचिन भेंडे, पंकज शेलोटकर, राजू टेभरे, अभय मेशनकर, प्रा. सुशील बत्तालवार, माजी पंचायत समिती सभापती गायत्री ठाकूर हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्टचे सचिव मनीषा आकरे, राहुल निवडुंगे, नंदू पाली आदींच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन खेळाडूना बक्षीस बहाल करून गौरव करण्यात आला. बक्षीस वितरण सोहळा समारंभाचे संचलन शरयू शिवणकर व अभिजित पवार यांनी केले. तर आभार हरिहर मिश्रा यांनी केले. सर्व आजी माजी हॉकी खेळाडू व हॉकी क्रीडा प्रेमींनी पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...