आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअतिशय स्पर्धेच्या काळात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची सलग 25 वर्षे जबाबदारी सांभाळणारे नानासाहेब नाकाडे हे राज्यातील एकमेव अध्यक्ष असून त्यांनी समितीचा प्रसार व शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी यवतमाळ जिल्हा शाखेने आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात केले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाध्यक्ष नानासाहेब नाकाडे यांच्या सेवापूर्तीनिमित्त माजी राज्य सरचिटणीस बाबासाहेब कपिले यांच्या अध्यक्षतेत कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी राज्य नेते काळूजी बोरसे पाटील, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, अमरावती जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी सुद्धा नानासाहेब नाकाडे यांनी गेली सतत २५ वर्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा विचार संपूर्ण जिल्ह्यात पोचवून शिक्षकांना जागरूक करून प्रत्येक संप व आंदोलनात सहभागी केले. शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची यशस्वी सोडवणूक करून जिल्ह्यात शिक्षक समितीचे संघटन भक्कम केले असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी राज्य कोषाध्यक्ष केदुजी देशमाने, राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर, गोंदिया जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, अमरावती सरचिटणीस सदानंद रेवाळे, विभागीय सरचिटणीस सतीश सांगळे, नाशिक जिल्हाध्यक्ष आनंद कांदळकर तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरचिटणीस गजानन देऊळकर, संचालन अभिजित नवलकर व प्रफुल्ल पुंडकर तर आभार किशोर सरोदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विलास गुल्हाने, देवेंद्र चांदेकर, हरिदास कैकाडे, पुंडलिक रेकलवार, मुकेश भोयर, विजय माने, चारुहास सारफळे, सुनीता जतकर, राधेश्याम चेले, मिलिंद देशपांडे, आशन्ना गुंडावार, विजय लांडे, महेश सोनेकर, राजू जुमळे, संदीप क्षीरसागर, संदीप मोहाडे, प्रमोद बहाड, विशाल ठोंबरे, जितेंद्र गुल्हाने, संजय राऊत, नम्रता बिसने, नीता गावंडे, सुनीता काळे, अनिल उत्तरवार, संजय काळे, विनोद क्षीरसागर, सुभाष पारधी, यशवंत काळे, मारोतराव काळेकर, श्रीकृष्ण फुफरे यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.