आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्लक्ष:नांदगाव खंडेश्वर शहराला दर पंधरा‎ दिवसांआड होतोय पाणीपुरवठा‎

नांदगाव खंडेश्वर‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सात वर्षांपूर्वी नांदगाव‎ ग्रामपंचायतीचे रूपांतर‎ नगरपंचायतीमध्ये झाले. मात्र‎ अद्यापही ३३ वर्षांपासूनची पाणी‎ समस्या ‘जैसे थे’च आहे. आजही‎ शहरवासीयांना १५ दिवसाआड‎ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे‎ शहरातील ही पाण्याची समस्या‎ सुटणार तरी कधी, असा प्रश्न‎ नांदगाव खंडेश्वरव सीयांकडून‎ उपस्थिती केला जात आहे.‎

पाण्याचे नियोजन कमी आणि‎ लोकसंख्या जास्त अशी शहराची‎ अवस्था झाली आहे. त्यातच‎ ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात‎ जमिनीमधील पाइपलाइन व त्यावर‎ असलेले ६४ व्हॉल्व्ह असलेली‎ पाइप लाइन अद्यापही कायम‎ असल्याने शहरातील पाणी समस्या‎ दिवसागणिक नागरिकांसाठी‎ डोकेदुखी ठरत आहे. व्हॉल्व्ह,‎ पाइपलाइन व पाण्याच्या‎ स्रोताअभावी पाण्याची समस्या‎ आता प्रचंड वाढत असल्याने‎ नागरिकांनी स्वतः लाखो रुपये खर्च‎ करीत बाेअर करून स्वतःसाठी‎ पाण्याची व्यवस्था केली.

त्यामध्ये‎ काहींना पाणी लागले, तर काहींच्या‎ हातात दगडाशिवाय काहीही आले‎ नाही. आजही नागरिकांना स्वत:च‎ पाण्याची व्यवस्था करावी लागत‎ असल्याने १० कोटींची चांदी प्रकल्प‎ योजना कुचकामी ठरल्याचे चित्र‎ शहरातील १५ दिवसाआड होणारा‎ पाणी पुरवठा पाहून लक्षात येते.‎ ग्रामपंचायत काळात पाण्यासाठी‎ १० कोटी रुपयांची योजना आली‎ होती.

मात्र वर्षातील तीन महिने‎ सोडले, तर उर्वरित नऊ महिने‎ भीषण पाणी टंचाईचा सामना‎ नागरिकांना करावा लागतो, शहरात‎ बरेच ठिकाणी नवीन वसाहती तयार‎ झाल्यात. मात्र तिथपर्यंत साधी‎ पाइपलाइन सुद्धा पोहोचली नाही.‎ तेथील नागरिकांना नाइलाजाने‎ पाण्यासाठी हजारो रुपये खर्च‎ करण्याची वेळ आली आहे. २१‎ हजारांच्या आसपास लोकसंख्या‎ असलेल्या शहरा नगर‎ पंचायतीकडून वर्षांचा पाणी पट्अी‎ कर वसुल केला जातो. मात्र पाणी‎ पुरवठा केवळ वर्षातील नऊ महिने‎ महिन्यातून दोन वेळा केला जाता.‎ त्यामुळे नागरिक पाण्याच्या‎ समस्येमुळे वैतागले असून,‎ पाण्याचा संघर्ष मिटणार तरी कधी,‎ असा सवाल नागरिकांकडून‎ उपस्थित केला जात आहे.‎

प्रशासनाने करावे योग्य नियोजन
‎ नांदगाव खंडेश्वर शहराकरिता १० कोटींची‎ चांदी प्रकल्प योजना आणली. आम्ही योजनेचे‎ पक्षाच्या वतीने ऑडिट केले होते. २४‎ तासांमध्ये दररोज १४ लाख घन लिटर पाणी‎ येते. शहराची तहान सध्या १० लाख लिटरची‎ आहे. शहराला जास्तीचे ६४ आऊट सोर्सिंग‎ व्हॉल्व्ह न ठेवता ४ व्हॉल्व्ह वरच प्रशासनाने‎ नांदगाव शहराचे नियोजन करावे.‎ -श्याम शिंदे, तालुका सचिव, माकप‎

प्रशासनाने घ्यावे मनावर‎
चांदी प्रकल्पावरील वीज पुरवठा सतत‎ खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा व्यवस्थित‎ होण्याच्या दृष्टीने लवकरच २४ तास विज‎ पुरवठा राहावा याकरिता ऐक्सेस फिडर‎ बसविण्यात यावे, यासाठी आमदार अडसड‎ यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहराला‎ चौथ्या दिवशी पाणीपुरवठा होईल. प्रशासनाने‎ मनावर घेतले, तर सर्व शक्य आहे.‎ -संजय पोफळे, माजी नगराध्यक्ष, नांदगाव खं.‎

कमी जास्त विद्युत दाबामुळे निर्माण होतेय समस्या
‎विद्युत दाब कमी जास्त राहत असल्याकारणाने नियमित मोटार पंप चालू राहत नाही. त्यामुळे‎ मुख्य स्त्रोतातून जलसाठा अपूर्ण होत आहे. त्यामुळे शहरात पाणी पुरवठ्यासाठी विलंब होत आहे.‎ संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू आहे.‎ -अभिजित लोखंडे, पाणीपुरवठा अधिकारी, नगरपंचायत, नांदगाव खंडेश्वर‎

बातम्या आणखी आहेत...