आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिग्रस शहराला पाणी पुरवठा करणारे नांदगाव धरण ९ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे उदध्वस्त झाले होते. पुनर्बांधणी करिता मागणी होत होती. अखेर सन २०१८ मध्ये या धरणाच्या पुनर्बांधणीची निविदा निघाली होती. जवळपास नऊ कोटी रुपये या करिता मंजूर करण्यात आले होते.
पुढील एका वर्षांमध्ये या धरणाचे काम पूर्ण होणार होते. परंतु तांत्रिक अडचणी आल्याने तीन वर्षे उलटून देखील या धरणाचे बांधकाम पूर्ण होऊ शकले नव्हते. ज्या कंत्राटदार कंपनीने या धरणाच्या बांधकामाची निविदा मंजूर झाली होती. त्यांच्या नुसार शासना कडील उर्वरित निधी अप्राप्त असल्याने धरणाचे काम पूर्ण होऊ शकले नव्हते. शिवाय वाढीव रकमेचा प्रस्तावही मंजूर झालेला नव्हता. या बाबत दै दिव्य मराठी मधून वृत्त वारंवार प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल माजी मंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड यांनी घेऊन राज्याच्या नगर विकास मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. अखेर शासनाने या धरणाच्या पुनर्बांधणी करिताच्या वाढीव रकमेला मंजूरी मिळून सर्व रक्कम मिळाली. त्यानंतर धरणाचे थांबलेले काम पूर्णत्वास आले आहे.
धरण कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा
या धरणाच्या पुनर्बांधणी करिता अनेकदा मागणी झाली. विविध संघटनांनी ही मागणी केली. यावर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार संजय राठोड यांनी सतत पाठपुरावा करून नांदगव्हाण धरण पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा केला. सदर धरणाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारांनी सांगितले की धरणाचे काम पूर्ण झाले असून फक्त टेक्निकल ऑडिट बाकी आहे. ही एक प्रशासकीय प्रक्रिया आहे. धरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या वर्षी पासून पूर्ववत प्रमाणे नांदगव्हाण धरण कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.