आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऊसाने भरलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने तो अनियंत्रित होऊन त्याने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी स्वारास समोरा समोर जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. ही घटना बुधवारी ( ता . ८ ) रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. यात अनियंत्रित झालेला ट्रक रस्त्यालगतच्या दरीत जाऊन पलटी झाला. ट्रकचालक ट्रकच्या कॅबिनमध्ये फसलेला होता.
त्याला काढण्याचे प्रयत्न परिसरातील नागरिक व बाभूळगाव येथील पोलीस करीत होते. एम.एच. ३१ सी.बी. ६७३६ या क्रमांकाचा ट्रक अमरावती जिल्ह्यातून देवगाववरून बाभूळगावकडे ऊस भरून येत होता. तर विरूद्ध दिशेने येणारी एम.एच. २९ बी.वाय. २०३१ या दुचाकीने दोघे येत होते. त्यात बाभुळगाव तालुक्यातील पालोती येथील सुभाष गुबरे ( वय ५० ) व सिनान्ना पवार ( वय ६० ) यांचा समावेश होता. ते दोघे जण आर्णी तालुक्यातील नवआटी येथून अंत्यविधीचा कार्यक्रम आटपून घरी परत येत होते. अगदी हाकेच्या अंतरावर आलेल्या दुचाकीस्वारांना उसाने भरलेल्या ट्रकने अचानक चिरडले.
यात या दोघांचाही जागीच मृत्यु झाला. घटनेची माहीती परिसरातील नागरिकांना कळताच घटना स्थळावर ग्रामस्थाचा जमाव प्रचंड प्रमाणात झाला होता. मृतदेह बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर ट्रकचालक हा चेंदामेंदा झालेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या अवस्थेत होता. त्याला काढण्यासाठी बाभूळगाव पोलीस यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.