आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय परिषद:दिग्रसच्या देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद; प्राचार्य सुभाष गवई यांनी मानवी हक्क व कायदे या विषयावर प्रकाश टाकला

दिग्रस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सविताबाई उत्तमराव देशमुख महाविद्यालयात नुकतेच एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख, प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. सुभाष गवई, प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. धनंजय सोनटक्के, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप काळे, विद्यापीठ अभ्यास मंडळ सदस्य डॉ. सुनील चकवे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय गावंडे उपस्थित होते.

याप्रसंगी धनंजय सोनटक्के यांनी उच्चशिक्षण व मानवी हक्क या विषयावर प्रकाश टाकला. प्राचार्य सुभाष गवई यांनी मानवी हक्क व कायदे या विषयावर प्रकाश टाकला. डॉ. संदीप काळे यांनी उच्च शिक्षणावरील कायदे यावर चर्चा केली. डॉ. सुनील चकवे यांनी उच्च शिक्षणामध्ये झालेले बदल व मानवी हक्क या विषयावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. गोल्डी जांभुळकर यांनी केले. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजय गावंडे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन डॉ. तुकाराम कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. दीपक उलेमाले, डॉ. अविनाश जाधव, डॉ. दामोदर दुधे, प्रा. सैय्यद अनीस, अनिल देशमुख, कोमलसिंग राठोड, राजेश गंगथडे, परमेश्वर राठोड यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...