आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ प्रदर्शन:मोहनाबाई कन्या शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस‎

दिग्रस‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जयंती निमित्य मोहनाबाई‎ कन्या शाळा, दिग्रस येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस'' २८‎ फेब्रुवारीला साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षा शुभदा बोंपिलवार, प्रमुख मार्गदर्शिका‎ करिष्मा हरसूलकर यांनी विस्तृतपणे //"रमण‎ इफेक्ट''बद्दल सोदाहरण स्पष्टीकरण केले.‎ प्रास्ताविकातून प्रियंका पटेल यांनी विज्ञान दिनाचे‎ महत्त्व सांगून कार्यक्रमाचे आयोजनामागील‎ वैज्ञानिक दृष्टीकोन मुलींमध्ये निर्माण करण्याचा‎ उद्देश कथन केला.‎ या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हास्तर विज्ञान‎ प्रदर्शनी मध्ये सहभागी विद्यार्थीनी दिव्या थेर, श्रावणी‎ डुकरे, वैष्णवी हेडगीर यांनी आपापल्या प्रयोगाचे‎ उत्तम सादरीकरण करून आपल्या प्रश्नोत्तराच्या‎ माध्यमाने प्रयोगांची व्यावहारिक जीवनातील‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ उपयोगिता स्पष्ट केली.

प्रमुख अतिथी म्हणून छाया‎ ढोले ह्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी‎ हेडगीर तर आभार श्रीमती भारती राऊत यांनी‎ मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पीयूष‎ चुकेकर, अरुण डुकरे, डॉ. अल्फा रोकडे, पुष्पा‎ सानप, शिल्पा पाटील, रजनी कोवे आदिनी परिश्रम‎ घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...