आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:स्कूल ऑफ स्कॉलर्स येथे‎ राष्ट्रीय विज्ञान सप्ताह‎ ; वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेचे आयोजन‎

यवतमाळ‎11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्कूल ऑफ स्कॉलर्स‎ विद्यालयांमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी‎ राष्ट्रीय विज्ञान सप्ताह उत्साहात साजरा‎ करण्यात आला.‎ राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने शाळेमध्ये‎ अनेक उपक्रम राबवण्यात आले.‎ शाळेच्या दैनंदिन परिपाठ मध्ये वर्ग १ ते ९‎ च्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक टाळी,‎ विज्ञानावर आधारित भाषण, नाटिका‎ ,विज्ञान गीत, मातीच्या प्रतिकृती, सीजन‎ क्राऊन मेकिंग व नृत्य सादर केले. तसेच‎ वर्गामध्ये वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित‎ ध्यानधारणा विद्यार्थ्यांकडून करून‎ घेण्यात आली. याचबरोबर कॉन्ट्रप्शन‎ नवीन संकल्पना वर्ग आठवी व नववीच्या‎ विद्यार्थ्यांनी सादर केली. सुप्त‎ कलागुणांना वाव मिळावा यासाठी‎ वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेचे सुद्धा आयोजन‎ करण्यात आले.

आरोग्या विषयी‎ जागरूकता निर्माण व्हावी यासाठी‎ किशोरावस्थेतील आरोग्य समस्या या‎ विषयावर मीनल दांडगे महिला व‎ बालविकास विभाग सखी वन स्टॉप सेंटर‎ यांनी कार्यशाळा घेतली. याचबरोबर‎ सुषमा औतकर व श्वेता लिचडे यांची‎ उपस्थिती लाभली. विज्ञानावर आधारित‎ छोटे छोटे जादूचे खेळ, विज्ञानावर‎ आधारित विविध प्रतिकृती करून‎ विद्यार्थ्यांनी आपली विज्ञान विषयाची‎ गोडी दाखवली.‎

हे संपूर्ण उपक्रम विज्ञान विभाग प्रमुख‎ श्रद्धा गौरखेडे, प्राथमिक विभाग प्रमुख‎ सायली कशाळकर यांच्या‎ मार्गदर्शनाखाली पार पडले. हे उपक्रम‎ यशस्वी होण्याकरिता प्रणाली तांबेकर,‎ वृषाली बोरकर, नीता बोपचे व संपूर्ण‎ विज्ञान शिक्षकांनी परिश्रम घेतले. हे‎ उपक्रम यशस्वी झाल्याबद्दल शाळेचे‎ मुख्याध्यापक नरेंद्र सिंह चौहान व‎ उपमुख्याध्यापिका रीना काळे तसेच‎ प्रशासकीय अधिकारी कुणाल वाघमारे,‎ भैरव मुंजाल यांनी सहकार्य केले.‎

बातम्या आणखी आहेत...