आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बाभूळगाव तहसील कार्यालयासमोर‎ राष्ट्रवादीचे काँग्रेसचे धरणे‎

बाभूळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे‎ येथील तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात‎ आले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर अतिवृष्टीने‎ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, खरीप हंगामाच्या‎ उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट आली, पीक विमा‎ कंपनीने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक नुकसानीची‎ मदत दिली नाही. हवालदिल झालेल्या शेतकरी व‎ कष्टकऱ्यांना न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी हे‎ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात‎ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत वानखडे,‎ शहराध्यक्ष सय्यद जहीर, संकेत टोणे, जिल्हा‎ उपाध्यक्ष आशिष सोळंके, रमेश कठाळे, प्रवीण‎ खेवले, दिनकर कोंबे, अशोक भोंग, विजय‎ कालंकार, धीरज जुनघरे, नागेश ठाकरे, दीपक‎ तातेड, मधुकर निवल, शहजाद शेख, माधव‎ नेरकर आदी सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...