आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयहिंद क्रीडा:राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत नव जयहिंद क्रीडा मंडळ विजयी ; वरोरा येथे पार पडली स्पर्धा

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुका क्रीडा संकुल वरोरा यांच्या वतीने दिनांक २९ ते ३१ मे दरम्यान तालुका क्रीडा संकुल वरोरा येथील मैदानावर राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत यवतमाळ येथील नव जयहिंद क्रीडा मंडळाच्या मुलींच्या संघाने १८ वर्षे वयोगटातील स्पर्धेत दणदणीत विजय संपादन केला. या स्पर्धेत संपुर्ण विदर्भातील संघ सहभागी झाले होते. अंतिम सामना नव जयहिंद क्रीडा मंडळ यवतमाळ आणि विदर्भ युथ क्रीडा मंडळ काटोल या दोन संघात पार पडला. या सामन्यात यवतमाळ संघाने काटोल संघाचा एक डाव व एक गुणाने पराभव करीत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रीना मेश्राम हिच्या उत्कृष्ट संरक्षणामुळे तर प्रीती ठाकरगे व वेदिका काळे यांच्या कडव्या आक्रमणामुळे काटोल संघावर नव जयहिंद क्रीडा मंडळाने सहज मात केली. रीना मेश्राम हिला उत्कृष्ट संरक्षणाचा पुरस्कार प्राप्त झाला तर प्रीती ठाकरगे हिला उत्कृष्ट आक्रमकाचा पुरस्कार प्राप्त झाला. या संघात वरील दोन खेळाडूं सोबतच संघात गुंजन खीची, जानवी हिवरकर, प्रणवती लोखंडे, भूमिका कोडपटवार, गौरी पेंदोर, खुशी माटे, चंचल भवरे, वृषाली तराळे, कीर्ती देऊळकर यांचा समावेश होता. विजयी संघाला आ. प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते चषक व दहा हजार रुपये रोख पारितोषिक देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...