आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदय परीक्षा:कस्तुरबा गांधी विद्यालयात नवोदय परीक्षा सुरळीत; 203 विद्यार्थी उपस्थित तर 25 विद्यार्थी अनुपस्थित होते

ढाणकी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा कस्तुरबा गांधी विद्यालयात शांततेत व नवोदय विद्यालयाच्या निर्देशानुसार पार पडली. यावेळी २०३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. दरम्यानच्या काळात गटशिक्षण अधिकारी पांडुरंग खांडरे यांनी केंद्राला सुरवातीलाच भेट देवुन परीक्षेचे व्यवस्थापन नियमानुसार आहे की नाही याची पाहणी केली.

या परीक्षेची पुर्वतयारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना सभागृहात निवासी जिल्हाधिकारी चैधरी व प्राचार्य धोपटे यांनी सभेचे आयोजन करून सर्व संबधितांना परीक्षेचे महत्व समजावुन सांगितले. त्या अनुशंगाने कस्तुरबा गांधी कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सर्व कोवीड -१९ च्या नियमाचे पालन करून, शाळेचा परिसर सॅनिटाईज करून वेळेच्या आत प्रवेश देवुन चोख बंदोबस्तात परिक्षा पार पडली. २०३ विद्यार्थी उपस्थित तर २५ विद्यार्थी अनुपस्थित होते.

केंद्र संचालक प्रा. डी. एस वाघमारे, सहा. केंद्र संचालक भारत भिंबरवाड, यांनी हे परीक्षा नवोदय विद्यालयाच्या निर्देशानुसार पार पाडावी म्हणुन ज्येष्ठ शिक्षक अरूण देषमुख, डी.पी सुर्यवंशी, प्रा. यु डी गवई, यांनी त्यांना मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या प्राचार्या एस. बी. शिंदे यांनी या परीक्षेच्या दरम्यान गटशिक्षणाधिकारी खांडरे यांच्यासह प्रत्येक खोलीची पाहणी केली. नितीन भगत, ए. बी. नलेवाड, राहुल चंद्रे, बबन इंगळे, यांनी सुध्दा परिक्षा केंद्रावर महत्वपूर्ण योगदान दिले.

यावेळी ठाणेदार प्रताप भोस, पोलीस उपनिरीक्षक कपिल मस्के, यांनी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. नीलेश भालेराव, देविदास हाके व होमगार्ड जिवन महाजन हे केंद्रावर या वेळी उपस्थित होते. त्यामुळे परीक्षा केंद्राबाहेर किंवा केंद्र परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी दिसुन आली नाही.

बातम्या आणखी आहेत...