आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा अपघातात मृत्यू

पुसद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसदपासून जवळच असलेल्या निंबी येथील घाटात दुचाकी स्लिप होऊन २८ वर्षीय नवरदेवाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार, दि. १९ जूनला दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली आहे. नवरदेवाने हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, असे प्रत्यक्षदर्शींकडून बोलल्या जात आहे. लग्नासाठी क्रुझर ठरवण्यासाठी नवरदेव वाशीम येथे गेला होता. उमरखेड तालुक्यातील चातारी येथे राहणारा अमोल दिलीपराव माने (२८) असे मृत नवरदेवांचे नाव आहे.

चातारी येथे राहणारा अमोल माने याचे दि. ३० जूनला लग्न ठरले होते. त्यानुसार अमोल याने व त्याच्या नातेवाईकांनी घरातल्या मंडळींनी सर्वत्र पत्रिका देखील वाटल्या होत्या. नियोजित लग्नासाठी लागणारी क्रुझर ठरविण्यासाठी अमोल स्वतः त्याचा मित्र सुमित सोबत दुचाकीने गेला होता. त्यानंतर तो दि. १९ जूनला दुपारी १ वाजता वाशिमवरून पुसदमार्गे चातारी येथे परत जातांना निंबी गावाजवळील घाटात मोटार सायकल स्लीप झाली. त्यात अमोलचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार सुमितला किरकोळ जखमा झाल्या आहे. घटनेची माहिती मिळताच पुसद ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...