आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे कृषी मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत सापडले असून राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात जोरदार संताप व्यक्त केला आहे. यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बसस्थानक चौकात मंगळवारी आंदोलन करत मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीने राज्यभर रान माजवले अाहे. आक्षेपार्ह विधान प्रकरणी मुख्यमंत्र्यानी सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. शहरातील बसस्थानक चौकात महिला राष्ट्रवादी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. सत्तार यांच्या फोटोला जोडे मारत निषेध नोंदवला. यावेळी बाबासाहेब गाडे पाटील, महिला जिल्हाध्यक्ष प्रा. सारिका ताजने, माजी नगरपालिका सभापती अरुणा गावंडे, मनीषा काटे, मंजुळा तेजे, प्रियंका विरुटकर, प्रिया कडू, सीमा राहटे, नीलिमा निबांळकर, मिरा भोयर, संकेत टोणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.