आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील हिंगणघाट येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ऑटो चालक युनियनद्वारे सोमवारी महागाई व इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. सरकारविरोधात घोषणा देत ऑटोसह चालक मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. राज्य सरकारने एसटी बसमध्ये महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्याने ऑटोचालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे ऑटो चालक - मालक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच आजच्या वाढत्या महागाईच्या काळात पेट्रोल, डिझेल व सिलिंडरच्या वाढत्या दरामुळे ऑटो चालक- मालकासह सर्वसाधारण जनता त्रस्त झाली आहे.
राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलचे भाव कमी न केल्यास ऑटो चालक - मालक संघटना आपल्या परिवारासोबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी महागाई विरोधात नारेबाजी करून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, सुनील भुते, संजय गांभुले, राजू मुडे, प्रशांत एकोणकर, सुशील घोडे,आदित्य बुटे ऑटो युनियनचे सदस्य इमरान शेख , महेश ठाकूर, मुक्तार शेख, नरेश भगत, अनुप डाहाके, अमोल भिसेकर, अनिल कांबळे, शरद दुर्गे, रामा कांबळे, मतीन शेख, फिरोज शेख, विनोद वाघमारे, विष्णू बावणे, गजानन झाडे, सतीश जकनवार, किशोर दुधळकर, बालु घोटेकार, संजय हेडाऊ, प्रदीप जुमदे, जीतू हेडाऊ, अस्त्याम खान, शेख इरशाद, साजिद अहमद, किरण घोगसे, राजू सावध, स्वप्नील दाते, अक्षय पाटील आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.