आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदत:शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे ; संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

नेर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात पर्जन्यमान लक्षात घेता नेर दारव्हा तालुक्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला. शासकीय यंत्रणेकडून अद्यापही सर्वेक्षण व पंचनामे करण्यात आले नाही. राज्य शासनाने देखील शेतकरी हिताचे निर्णय अद्यापही घेतले नाहीत. शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तालुक्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढून दुबार तिबार पेरणी केली. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. अश्यावेळी शासनाने मदत देणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही शासनाची मदत मिळाली नाही. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये सरसकट मदत दयावी, खरीप हंगामात काढलेला पीक विमा जाहीर करून जाचक अटी रद्द करा, अश्या विविध मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत घुईखेडकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे, माजी सभापती नानासाहेब भोकरे, युवराज अर्मळ, तालुका उपाध्यक्ष, नीलेश ठाकरे, गजानन गोळे, राजू इंगोले, मधुकर ठाकरे, अमोल घरडे, भरत कुंभारखाणे, राजू झिबलकार, पंकज राठोड यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...